हिंद महासागरात चीन हातपाय पसरायला लागलाय. चीनच्या वाढत्या ताकदीला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी हिंदुस्थान सज्ज होतोय. भविष्यातील धोका ओळखून नौदलात सर्वशक्तिमान अशी पाणबुडी दाखल होतेय. ‘आयएनएस अरिघात’ असे तिचे नाव असून ही हिंदुस्थानची दुसरी आण्विक पाणबुडी आहे. मागच्या काही वर्षांपासून ‘आयएनएस अरिघात’ची चाचणी सुरू होती. ती आता अंतिम टप्प्यात आलीय. त्यामुळे ‘आयएनएस अरिघात’ शत्रूवर आघात करायला सज्ज असेल.
– ‘आयएनएस अरिघात’ ही ‘आयएनएस अरिहंत’ पाणबुडीप्रमाणेच 750 किलोमीटर रेंजच्या के-15 क्षेपणास्त्राने सज्ज असेल. n सात हजार टनचे ‘आयएनएस अरिदमन’ 3500 किलोमीटर रेंजच्या
– के-4 क्षेपणास्त्रासोबत पुढच्या वर्षी कार्यान्वित होईल. चौथा एसएसबीएन के-4 क्षेपणास्त्रs वाहून नेण्यास सक्षम असेल. 13500 टनाच्या एसएसबीएनला आणखी शक्तिशाली 190 मेगावॅट रिअॅक्टरसोबत बनवण्याची योजना आहे.