विमानवाहु ‘विक्रमादित्य’ युद्धनौका मालवणात दाखल

भारतीय नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवणात तारकर्ली समुद्रात नौदलाच्या विविध प्रात्यक्षिकांचे जोरदार प्रदर्शन सुरू आहे. लढाऊ विमानांच्या कवायती लक्षवेधी ठरत आहेत. मात्र, लढाऊ विमानवाहु नौका जनसमुदायाच्या दृष्टिक्षेपात येत नव्हती. सर्वांना विमानवाहु विक्रमादित्य या नौकेची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा अखेर संपली असून दांडी सामोरील दहा वाव खोल समुद्रात विक्रमादित्यचे आगमन झाले आहे. ही भव्य विमानवाहु युद्धनौका किनाऱ्यावरून दिसत आहे. परंतु सध्याचे वातावरण काहीसे धुकेमय असल्याने ती सुस्पष्ट दिसत नाही चार डिसेंबरला नौसेना दिन मालवण सागरामध्ये होत असून या पार्श्वभूमीवर ही युद्ध नौका सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर लागली आहे.