परळी तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्याकडून पाहणी

परळी तालुक्यातील मौजे सेलू (स) व पिंपळगाव (गाढे) शिवारातील झालेल्या गारपीट नुकसानग्रस्त पिकांची बीड जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. यासह मौजे देशमुख टाकळी, सिरसाळा,पांगरी, पिंपळगाव, वडखेल, कौठळी, रेवली,वाका इंजेगाव, मौ सेलू (स),पिंपळगाव (गाढे) शिवारात शनिवारी गारपीट झाली होती.

या गापपीटीत ज्वारी,सोयाबीन कांदा,मिर्ची,काकडी व इतर फळपिके व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांची पहाणी बीड जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी केली. यावेळी त्यांच्याबरोबर उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तालुका कृषी अधिकारी सोनवणे नायब तहसीलदार बी एल रुपनर , मंडळ अधिकारी तलाठी नवनाथ गर्जे तसेच सरपंच, परळी तालुक्यातील महसूल अधिकारी व शेतकरी बांधव हजर होते.