इंस्टाग्रामवरील प्रेम पडले महागात, लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या व्यावसायिकाला दीड कोटींचा गंडा

गिरगावात राहणाऱ्या एका हिरे व्यावसायिकाने इंन्स्टाग्रामवर परदेशी महिलेशी मैत्री केली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न करायचे ठरवले. पण स्वत:ला जहाजावरील कॅप्टन म्हणवणाऱ्या त्या महिलेने हिंदुस्थानात हिरे व्यवसायात रस दाखवत हिमांशू या व्यावसायिकाला दीड कोटीचा ऑनलाईन चूना लावला. याबाबत तक्रार दाखल होताच व्हि.पी रोड पोलिसांनी दिल्ली गाठून अशाप्रकारे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या नायजेरियन भामट्याच्या मुसक्या आवळल्या.

हिरे व्यवसायात ब्रोकरचे काम करणारे हिमांशू यांची इन्स्टांग्रामवर एका महिलेशी ओळख झाली. मग दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या मैत्रीCrने हिरे व्यवसायात पैसे गुंतावायची इच्छा व्यक्त करीत मिळेल तो नफा दोघांमध्ये घेऊ असे सांगितले. त्यामुळे हिमांशूचा तिच्यावर आणखी विश्वास बसला. त्यानंतर गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने त्या मैत्रीनीने आपले जाळे टाकले आणि त्यात हिमांशू अलगद अडकत गेले. दरम्यान, दिल्लीतून हिमांशू यांना फोन येऊ लागले आणि तुमचे गिफ्ट आले असून आवश्यक ती कस्टम ड्यूटी भरून ते घेऊन जा असे सांगण्यात येऊ लागले. त्यानंतर पाच लाख अमेरिकन डॉलर आले असून ते घेण्यासाठी भामट्यांनी हिमांशूला दिल्लीत बोलावले. हिमांशू दिल्लीत गेल्यावर तेथे तो नायजेरियन त्यांना भेटला. त्यावेळी त्याने सोबत आणलेल्या गाडीत एक लॉकर आणि त्यात अमेरिकन डॉलर सुद्धा हिमांशू यांना दाखवले. गंभीर म्हणजे त्या डॉलरवर हिमांशूचे नाव होते. त्यामुळे हिमांशू यांचा विश्वास बसला आणि तो नायजेरियन सांगेल तसेच हिमांशू त्याच्या बँक खात्यात पैसे पाठवू लागला. एक कोटी 16 लाख इतकी रक्कम त्या महिलेच्या नादात दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

नायजेरियन भामट्याने महिला बनून फसवले

हिमांशू यांनी व्हि.पी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रभारी वरिष्ठ निरीक्षक संध्याराणी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनवेश पाटील, सिद्धेश जोष्टे तसेच प्रभाकर आहेर, सचिन सरवदे, कुमार पाथरूट या पथकाने तांत्रिक बाबींचा अभ्यास करून गुन्ह्याचा तपासाला सुरूवात केली. गुन्ह्यांचे धागेदोरे दिल्लीत असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी दिल्ली गाठून हिमांशू यांना ऑनलाईन चूना लावणाऱ्या अकिरोडोलो जोसेफ ओजीडी या नायजेरियन भामट्याला बेड्या ठोकल्या. या ओजीडीने महिला भासवून इन्स्टावर हिमांशु यांच्याशी मैत्री केली होती

आपली प्रतिक्रिया द्या