अग्रीम देणार झटपट गृहकर्ज 

अग्रीम हाऊसिंग फायनान्सने तिच्या “अग्रीम इन्स्टा होम लोन्स’’द्वारे अवघ्या दहा मिनिटांत गृहकर्ज योजनेची घोषणा केली आहे. अग्रीम एचएफसी जोखीम मूल्यांकनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लार्ंनग आणि स्वमालकीच्या स्कोअरिंग मॉडेलचा वापर करत आर्थिकदृष्टय़ा कमकुवत वर्ग आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांमधील संभाव्य गृह खरेदीदारांच्या कर्ज पात्रतेचे मूल्यांकन करते. तसेच हे मॉडेल पारंपरिक वित्तीय संस्थांपेक्षा चारपट वेगाने कर्ज मंजूर आणि वितरित करते. यामुळे हंगामी कामगारांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अग्रीमची नवी यंत्रणा अवघ्या दहा मिनिटांत गृहकर्ज मंजूर करून 2-3 दिवसांत वितरणही करते.