आंतरजातीय विवाह झालेल्या कुटुंबात पुन्हा वादावादी, 17 जणांवर गुन्हे दाखल

668
fight
file photo

तालुक्यातील वाकी येथील कोळेकर व सावंत यांच्यात झालेल्या आंतरजातीय विवाहामुळे सातत्याने वादावादी सुरू आहेत. नूकत्याच झालेल्या हाणामारीवरून परस्परविरोधी फिर्यादीवरून 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोहन गोरख कोळेकर, युवराज कल्याण कोळेकर, चंद्रकांत युवराज कोळेकर, गोरख रंगनाथ कोळेकर या चार जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पंधरा दिवसांची कोठडी सुनावली आहे.

मुलीच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे मुलाचे भयभीत कुटुंब संरक्षण व संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आठ दिवसांपुर्वीच जामखेड तहसील कार्यालयासमोर जणावरांसह दोन दिवस उपोषणाला बसले होते. यावेळी तहसिलदार विशाल नाईकवाडे व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील व काही प्रतिष्ठीत नागरिकांच्या शिष्टाईने सदर दोन्ही कुटुंबियांना समोरासमोर बसवून समजुत काढून उपोषण मागे घेतले होते. मात्र आंतरजातीय विवाहावरुन पुन्हा भांडण न करण्यासाठी कसलेही लेखी घेतले नव्हते.

सदर दोन्ही कुटुंबांत नेहमीप्रमाणे दिनांक 14 रोजी पुन्हा मारहाण वादावादी सुरू झाली आहे. या मध्ये पहिल्या घटनेत फिर्यादी पिडीत महिला हिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की वाकी गावात मारूती मंदिराच्या जवळ चिंचेच्या झाडाजवळ मोटारसायकलवरून शेतात जात असतांना आरोपींनी रस्त्यात अडवून मला पाठीमागून धरले व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. या झटापटीत माझ्या गळ्यातील सोन्याचे गंठण गहाळ झाले. इतर साथीदारांना मारहाण केली याप्रकरणी चंद्रकांत युवराज महारनवर, नितीन मोहन कोळेकर, यूवराज कल्याण महारनवर, मोहन गोरख कोळेकर, बंडु मोहन कोळेकर, गोरख रंगनाथ कोळेकर, विजूबाई युवराज महारनवर, सिताबाई गोरख कोळेकर, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या घटनेत चंदकांत युवराज महारनवर यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की लोणी फाटा येथे मी आजोबाची वाट बघत असतांना आरोपींनी येऊन काहीही कारण न सांगता शिविगाळ दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व डाव्या हाताला चावा घेत जखमी केले. या वेळी भांडण सोडवणारांनाही शिविगाळ मारहाण केली. तसेच पुन्हा आमच्या नादी लागाल तर मुडदा पाडू अशी धमकी दिली.

याप्रकरणी आसाराम तुळशीराम सावंत, वैभव आसाराम सावंत, अनिता आसाराम सावंत रा वाकी, पिडीत महीला व अरुण काळे रा सारोळा ता जामखेड यांच्यासह आनोळखी 4 अशा एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने प्रकरणी चार जणांना अटक केली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कॉन्स्टेबल शिवाजी भोस व पोलीस नाईक अजय साठे हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या