अल्पबचतीवरील व्याजदरात कपात

7

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘जीएसटी’च्या पर्वाला सुरुवात झाली असतानाच अल्पबचतीच्या विविध योजनांवरील व्याजदरात ०.१ टक्क्याने कपात केली आहे. त्यामुळे अल्पबचत करणाऱ्या सामान्य जनतेला फटका बसणार आहे.

दर तीन महिन्यांनी अल्पबचतीच्या व्याजदरात केंद्र सरकारकडून आढावा घेतला जातो. यापूर्वी एप्रिल ते जून या ती महिन्यासाठी ०.१  टक्क्याने कपात केली होती. पुन्हा आता जुलै ते सप्टेंबर या काळात ०.१  टक्क्याने व्याजदर कमी केले आहेत.

  • योजना आणि व्याजदर
  • पीपीएफ योजनेत गुंतवणुकीचा व्याजदर ७.८टक्के असेल.
  • किसान विकास पत्र ७.५ टक्के.
  • सुकन्या समृद्धी योजना ८.४ वरून ८.३ टक्के.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनेचा व्याजदर ८.३ टक्के.
  • अल्पमुदत बचत १ ते ५ वर्षांसाठी (त्रैमासिक व्याज परतफेड) ६.८ ते ७.६ टक्के.
  • पाच वर्षांसाठीच्या रिकरिंगसाठी ७.१ टक्के व्याजदर असणार आहे.

काँग्रेस, डाव्यांचा बहिष्कार
‘जीएसटी’साठीच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमधील विशेष बैठकीवर काँग्रेस पक्षाने बहिष्कार टाकला. ‘जीएसटी’ची अंमलबजावणी घाईत केली जात आहे. केंद्रातील मोदी सरकार स्वतःचा प्रचार करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. तसेच तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, राजदसह विविध विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला.

आपली प्रतिक्रिया द्या