आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021, नवाजुद्दीन, सुष्मिता सेन, वीर दासला नामांकन

जगभरातील चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठsच्या समजल्या जाणाऱया आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021 साठी इंटरनॅशनल ऍकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्टस् ऍण्ड सायन्सने नुकतीच नामांकने जाहीर केली आहेत. 24 देशांमधून 11 विभागांत 44 नामांकने जाहीर केली आहेत.यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी, अभिनेत्री सुष्मिता सेन आणि कॉमेडियन वीर दास यांना नामांकने मिळाली आहेत.

आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱया नवाजुद्दीन सिद्धीकी याला नेटफ्लिक्सवरील ‘सीरियस मॅन’ या चित्रपटासाठी ‘बेस्ट ऍक्टर’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. नवाजने आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला असून दिग्दर्शक सुधीर मिश्रा आणि नेटफ्लिक्सचे आभार मानले आहेत. डिस्नी प्लस हॉटस्टारवर झळकलेल्या राम माधवानी दिग्दर्शित ‘आर्या’ या बेव सीरिजद्वारे सुष्मिता सेन हिने डिजिटल विश्वात पदार्पण केले होते. या सीरिजलादेखील ‘बेस्ट ड्रामा’ विभागात नामांकन मिळाले आहे, तर वीर दास यांच्या ‘वीर दास ः फॉर इंडिया’ या शोला कॉमेडी श्रेणीमध्ये नामांकन प्राप्त झाले.

sushmita-sen

आपली प्रतिक्रिया द्या