आयुष मंत्रालयाचा डॉ. रामदास आव्हाड यांना “इंटरनॅशनल एक्सलेन्स अवॉर्ड”

कोपरगाव येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड यांना आयुष मंत्रालयातर्फे “इंटरनॅशनल एक्सलेन्स अवॉर्ड”ने नुकतेच गौरविण्यात आले. हा पुरस्कार केंद्र सरकारचे आयुर्वेद सल्लागार डॉ. श्रीराम सावरीकर यांच्या हस्ते देण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी डॉ. स्वामी अवधूत शिवानंद महाराज, डॉ. नेसरी (सल्लागार, आयुष मंत्रालय) व अन्य पुरस्कारार्थी उपस्थित होते. ‘वर्ल्ड एक्स्पो’चे उदघाटन आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचे शुभ हस्ते झाले. यावेळी पनवेलचे  आमदार ठाकूर व अन्य राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या.

आयुर्वेद, होमीओपॅथ, युनानी,सिद्ध,योगा, निसर्गोपचार, दंत वैद्यक,  फिजिओथेरॅपी  या सर्व पॅथीचे हजारो व परदेशातील तीनशेहून अधिक डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते. चार दिवस चाललेल्या या एक्स्पोमध्ये प्रत्येक पॅथीतील तज्ज्ञांची व्याखाने झाली. डॉ. रामदास आव्हाड यांचे पंचकर्म व त्याचे व्यापद यावर व्याख्यान झाले. केंद्र सरकारचा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही कोपरगावसाठी अभिमानाची गोष्ट असून यापूर्वीही डॉ. आव्हाड यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ दिल्लीने राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणूनही नियुक्ती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या