मुहम्मद, अबुबकर यांना सुवर्ण पदक, आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ठाणेकरांची बाजी

कोरोनाच्या काळात क्रीडाविश्वही ठप्प आहे. गेल्या काही महिन्यांत युरोप, अमेरिका येथे काही क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवण्यात आल्या आहेत. यूएईमध्ये आयपीएलचा थरार रंगत आहे. हिंदुस्थानात मात्र अद्याप क्रीडा स्पर्धांना परवानगी देण्यात आलेली नाही. पण ऑनलाइन स्पर्धा घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल इंडोरयू कराटे दो फेडरेशनच्या वतीने ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुहम्मद उमर सय्यद व अबुबकर सय्यद यांनी सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धेत ठाणेकर खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.  ऑनलाइन घेण्यात आलेल्या या स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद लाभला. देशातील 16 राज्यांमधील जवळपास 350 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. प्रचीत शहा व युसरा शेख यांनी रौप्य पदकाला गवसणी घातली. तसेच सोलेहा सय्यद हिने कास्य पदक पटकावले. सोलेहा सय्यद या स्पर्धेत असिस्टंट स्कोअरर म्हणूनही कार्यरत होती. या स्पर्धेत पदक जिंकणारे सर्व खेळाडू ठाण्याचे आहेत हे विशेष.

आपली प्रतिक्रिया द्या