
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा मोठा बॉम्बस्फोट करण्यात आला. हा स्फोट बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये झाला असून यामध्ये 6 जणांचा मृत्यू आणि 19 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्वेटाच्या जरघून रोडजवळ हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. हा आत्मघाती हल्ला असल्याचे सांगण्यात आले असून स्फोटात सुसाईड बॉम्बरचाही मृत्यू झाला आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धूर पसरला होता. तसेच स्फोटानंतर गोळीबारही करण्यात आला. स्फटाची सूचना मिळाल्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
























































