आता पालिका शाळांमधून घडणार आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू

38

सामना ऑनलाईन, मुंबई

युवासेना प्रमुख, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईत फुटबॉलला सुवर्णझळाळी मिळत असून आता याच पार्श्वभूमीवर आगामी काळात मुंबईतील महापालिका शाळांमधून आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू घडताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. महानगरपालिका, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन व मुंबई सिटी एफसी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी परळ येथील सेंट झेवियर्स मैदानात महापालिका शाळांतील १२ वर्षांखालील मुलींना फुटबॉल या खेळाचे बाळकडू देण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला.

football-1

मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर कांडरकर, उपाध्यक्ष सॉतर वॅझ, सहसचिव उदयन बॅनर्जी, खजिनदार सोधना शेट्टी, शिक्षण क्रीडा विभागाचे रामेश्वर लोहे, अनुप दुबे, माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम मोठय़ा दिमाखात पार पडला.

गरीब, होतकरूंना मिळणार सुवर्णसंधी

मुंबईतील सर्व महापालिका शाळांमधील तसेच झोपड्यांमधील मुलांना आपल्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनद्वारे शोधमोहीम सुरू होणार आहे. त्यानुसार १२ वर्षांखालील मुले-मुलींना वीकेण्डमध्ये फुटबॉलचा आनंद घेता येईल. तसेच या शिबिरातून निवडण्यात येणाऱ्या मुलांना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सध्या सेंट झेविसर्स मैदानात सुपर डिव्हिजनचे फुटबॉल सामने खेळवण्यात येत आहेत हे विशेष. काही दिवसांपूर्वीच या मैदानात फ्लडलाइडस् लावण्यात आल्याचा फायदा आता होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या