कीर्तनातून व्यक्त झाली महिलांच्या कर्तृत्वाची गाथा

19

सामना ऑनलाईन । मालवण

मालवण तालुक्यातील हडी येथील फेस्कॉन संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून कीर्तनाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे विचार मांडण्यात आले. ह.भ.प. हृदयनाथ गावड यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञान आणि महिला सबलीकरणाचं महत्त्व कीर्तनातून सांगितलं. मंडळाच्या काही सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या