आज आंतरराष्ट्रीय योग दिन, वयाच्या दुसऱ्या वर्षापासून योग

एवढय़ा लहान वयात वान्याने योगासनांचा विक्रम केला आहे. मोठय़ांनाही कठीण वाटतील अशी आसनं सहजतेने करून तिने सर्वांना चकित केले आहे. दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात राहणाऱया वान्याने नुकतंच आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्वतःचं नाव नोंदवले आहे. तिच्या योगासनांचे फोटो सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहेत.

चिमुरडी वान्या योगा आर्टिस्ट ग्रुपची सदस्य आहे. तिचे वडील हेमंत शर्मा योगगुरू आहेत. वान्याने आशिया बुक रेकॉर्डसाठी 21 आसनं तर इंडिया बुक रेकॉर्डसाठी 14 आसनं सादर केली. वयाच्या दुसऱया वर्षापासूनच ती योगाभ्यास करत आहे. भुजंगासन, सेतुबंध आसन, पवन मुक्तासान, पर्कतासन, उत्कटासन, हलासन यांसारखी अनेक आसनं ती सहजतेने करते. कोरोना काळात आपण सारे घरात आहोत. त्यामुळे घरात योगासनं करा आणि फीट रहा, असा सल्ला द्यायला वान्या आणि तिचे बाबा देतात.

आपली प्रतिक्रिया द्या