कश्मीर संपर्कात; टेलिफोन, टूजी इंटरनेट सुरू

273
प्रातिनिधिक फोटो

कलम 370 हटविल्यानंतर हळूहळू केंद्र सरकारने जम्मूकश्मीरमध्ये घातलेले निर्बंध हटविण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपासून येथील शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार असून टेलिफोन आणि टूजी इंटरनेट सेवाही सुरू करण्यात आली आहे. जम्मूमध्ये टूजी इंटरनेट तर कश्मीरमधील लॅण्डलाइन फोनसेवा सुरू झाली आहे.

जम्मूकश्मीरचे मुख्य सचिव बी. आर. सुब्रमण्यम पत्रकार परिषदेत खोर्‍यातील परिस्थितीची माहिती देत येथील निर्बंध हळूहळू पूर्ववत होतील असे सांगितले. त्यानुसार शनिवारी 100 हून अधिक टेलिफोन एक्स्चेंज सुरू करण्यात आली. कश्मीरमधील गुरेज, तंगमार्ग, उरीकेरन करनाह, तंगधार, पहलगाम भागात टेलिफोन सेवा सुरू झाली. कश्मीरमधील अतिसंवेदनशील मानल्या जाणार्‍या पाच जिह्यांत निर्बंध अजूनही कायम आहेत. तर उधमपूर, रियासी, कठुआ, सांबा व जम्मू शहरात टूजी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

सोमवारपासून शाळामहाविद्यालये सुरू

प्रधान सचिव रोहित कंसल यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमवारपासून खोर्‍यातील शाळामहाविद्यालये सुरू होतील असे स्पष्ट केले. सोमवारी प्राथमिक शाळा उघडतील, पण माध्यमिक शाळा काही दिवसांनी सुरू होणार आहेत. खोर्‍यातील 96 पैकी 17 टेलिफोन एक्स्चेंज सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या