ट्रेनमध्ये थ्री इडियट्स स्टाईलनं केली महिलेची प्रसूती

22

सामना ऑनलाईन । नागपूर

थ्री ईडियट्स चित्रपटामध्ये अभिनेता अमिर खान मोबाईलद्वारे मित्रांच्या मदतीनं एका महिलेची प्रसूती करताना आपण पाहिलंच असेल. असाच एक प्रकार सत्यातही घडला आहे. अहमदाबाद ते पुरी असा ट्रेननं प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला अचानक प्रसुतीवेदना सुरू झाल्या. त्याच रेल्वेतून एक २४ वर्षांचा एमबीबीएसचा विद्यार्थी प्रवास करत होता. त्या विद्यार्थ्यानं व्हॉट्सअॅपच्या मदतीनं वरिष्ठ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत महिलेची प्रसुती केली आहे.

२४ वर्षांची एक गर्भवती महिला अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसनं प्रवास करत असताना तिला अचानक प्रसुतिवेदना सुरू झाल्या. त्यावेळी ट्रेन नागपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर होती. नातेवाईक आणि टीसी ट्रेनमध्ये डॉक्टरांची शोधाशोध करत असताना विपीननं त्यांना मदत केली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार, विपीन खडसे नावाचा हा नागपूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेणारा तरुण प्रवास करत होता. प्रशिक्षण घेत असूनही या तरुणानं वरिष्ठांच्या मदतीनं प्रसुती पार पाडली.

आपली प्रतिक्रिया द्या