आकाश कुंभार फिटनेस फोटोग्राफीचा मराठमोळा विश्वविक्रमी छायाचित्रकार

>>नितीन फणसे 

फिटनेस फोटोग्राफीसारख्या काहीशा अनोळखी क्षेत्रात थोडेथोडका नाही तर चक्क विश्वविक्रम करण्याचा पराक्रम आकाश कुंभार या मराठमोळ्या तरुणाने नुकताच केला. आता याच क्षेत्रात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नाव समाविष्ट करण्याचा त्याचा इरादा आहे.  

फिटनेस मॉडेल्स आणि बॉडीबिल्डर्स यांचे छायाचित्रण फोटोग्राफी करणं ही संकल्पना परदेशात खूपच परिचीत आहे, पण आपल्या हिंदुस्थानात हे काय नवीन असं म्हटलं जातं. फिटनेस फोटोग्राफीच्या याच क्षेत्रात थोडेथोडके नाही तर चक्क विश्वविक्रम करण्याचा पराक्रम आकाश कुंभार या मराठमोळ्या तरुणाने नुकताच केला. आता या वर्षभरात त्याला फिटनेस फोटोग्राफीमध्येच गिनीज बुक ऑफ कर्ल्ड रेकॉर्डमध्येही जाणार आहे.

फिटनेस फोटोग्राफी ही संकल्पना नेमकी काय आहे याबाबत बोलताना आकाश म्हणाला, लिमका बुक ऑफ कर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया या दोन ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड अटेंड केलाय. एकूण 350 फिटनेस मॉडेल्स आणि बॉडीबिल्डर्स यांचे फोटोज केवळ 10 तासांमध्ये शूट केलेत. या कालावधीत 11 हजार फोटो काढले आहेत. 2012 पासून या क्षेत्रात प्रोफेशनली काम करतोय. या काळात बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंची, त्यांच्या फिटनेसची छायाचित्रे काढली आहेत. बॉडी पॉवर एक्स्पोमध्ये मी हा विश्वविक्रम केलाय.

आकाश कुंभार याने काढलेली छायाचित्रे आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय मासिकांमध्येही आली आहेत. इथली मासिकं आणि परदेशातील मासिकं यात काय फरक जाणवतो, असे विचारता तो म्हणतो, “आपल्याकडेही फॅशन फोटोग्राफीची मासिकं आहेत, पण फिटनेस फोटोग्राफीबद्दल आपल्याकडे तेवढं जास्त महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे येथे मला जास्त संधी मिळाली नाही.”

विश्वविक्रम करताना आकाशला अडचणी तर आल्याच असतील. पण याबाबत तो म्हणतो, “अडचणी अशा फारशा आल्या नाहीत. कारण पहिलं म्हणजे बॉडी पॉवर एक्स्पोचा सपोर्ट होता. त्यात काही फिटनेस उपकरणांचे ब्रॅण्ड तर आपणहून माझ्याकडे आले. त्यांनीही हरप्रकारे मदत केली. या सगळ्यामुळे सर्व सोपे झाले.” 

ही संकल्पना उपेक्षितच

फिटनेस फोटोग्राफी हा प्रकार परदेशात मोठ्या प्रमाणावर चर्चिला जातो. पण आपल्याकडे हिंदुस्थानात ही संकल्पना फारशी रूळलेली नाही. याबाबत छेडले असता आकाश म्हणतो, ”फिटनेस फोटोग्राफीमध्ये मी विश्वविक्रम केलाय, पण आपल्याकडे लोकांना एक तर ते ठावूकच नाही किंवा त्याबाबत त्यांना जास्त महत्त्व वाटत नाही. म्हणूनच तर मी हा विक्रम केल्यावरही मला हिंदुस्थानातून फारशा प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत. याचं मला आश्चर्यही वाटतं आणि थोडा खेदही वाटतो. अगदी ठरावीक म्हणजे बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांनी व मित्रांनी माझं अभिनंदन केलं. पण ते तर करणारच होते. पण इतर अनोळखी लोकांकडूनही प्रतिक्रिया येतील अशी अपेक्षा होती, पण ती फोलच ठरली,” असं त्याने स्पष्ट केलं.

जे असते ते वास्तव

फॅशन फोटोग्राफी आणि फिटनेस फोटोग्राफी या दोन वेगवेगळ्या बाबी असल्याचं तो सांगतो. आपल्याकडे लोकांना तेच नेमकं माहीत नाही असं सांगून तो पुढे म्हणतो, “एखाद्या फॅशन मॉडेलचं फोटोशूट करणं तसं सोपं आहे. कारण त्याला स्वतःला त्याबाबत चांगली माहिती असते. आपण कसं उभं राहायचं, कसे हावभाव ठेवायचे, मेकअप कसा करायचा… पण एखाद्या धावपटूचे फोटो काढताना खूप काळजी घ्यावी लागते. सराव म्हणून बरीच वर्षे तो त्याच्या फिटनेसकर लक्ष देत असतो. त्यामुळे त्याचा एकेक पिळदार स्नायू फोटोत यायला हवा ही काळजी त्याला नाही, मला घ्यावी लागते. फॅशन फोटोग्राफीमध्ये बहुतांश मेकअप आणि पेहराव यांचा भाग जास्त असतो, पण फिटनेस फोटोग्राफीमध्ये मेकअप कमी असतो. जे काही असतं ते वास्तव असतं. त्याकेळी मला त्याचे हावभाव आणि लायटिंगवर जास्त काम करावं लागतं. हा फरक या दोन फोटोग्राफींमध्ये आहे.”

आपली प्रतिक्रिया द्या