मला हे दत्तगुरू दिसले!

290

दत्त महाराज हे माझे आवडते दैवत ,सांगतोय गायक प्रथमेश लघाटे

  • तुझं आवडतं दैवत ?

– दत्त महाराज आवडतात.

  • त्यांचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं ?

– महाराजांना ‘गायन सेवा’ अत्यंत प्रिय आहे. त्यांची स्तुती गाण्यातून करतो.

  • संकटात ते तुला कशी मदत करतात, असं वाटतं ?

– काही वेळा आवाज ठीक नसतो किंवा गाण्याचा माहोल बनत नाही. कितीही तयारी असली तरी रंगदेवता प्रसन्न होणं महत्त्वाचं असतं. त्यावेळी महाराजांना प्रार्थना करतो आणि ते मदत करतात.

  • संगीत कला आणि भक्तीची सांगड कशी घालतोस ?

– संगीत आहे तिथे भक्ती आणि भक्ती आहे तिथे संगीत असलेच पाहिजे. उपासना करत असू तर तो भाव कलेतही रुजतोच.

  • कलाकाराची कला साकारण्याकरिता देवाची कशी मदत होते ?

– आपण कितीही मोठे कलाकार असलो तरीही कला सादर करताना प्रत्यक्ष रंगदेवतेची उपस्थिती असणं हे देवाच्या आशीर्वादानेच घडू शकतो. यासाठी प्रार्थना करतो.

  • आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग ?

– तब्येत बरी नसताना दत्त महाराजांना प्रार्थना करून कार्यक्रम सुरू केला. तेव्हा अपेक्षापेक्षा कार्यक्रम छानच झाला.

  • त्यांच्यावर रागावता का ?

– मनाविरुद्ध घडले तर परिस्थितीमुळे चिडचिड होते तरीही त्यांचा राग येत नाही. कारण योग्य-अयोग्य काय आहे हे त्यांना माहीत असतं असं मला वाटतं.

  • देवबाप्पा तुमचे लाड कसे पुरवतो ?

– काही वेळा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि तोच पदार्थ खायला मिळतो.

  • आवडत्या दैवताचे कोणते स्वरूप आवडते?

– त्यांची मूळ रुपातली त्रिमूर्ती आणि सोबत चार वेद स्वरुपातले श्वान आणि गाय असं स्वरुप भावतं.

  • त्यांच्यापाशी काय मागणं मागतोस ?

– ‘त्यांची सेवा करणं’या भावनेनं मी गात असतो. त्यामुळे माझी गायन कला जास्त प्रगल्भ, प्रगत व्हावी. हे मागणं मागतो.

आपली प्रतिक्रिया द्या