ग्रंथालय संमेलनाच्या निमित्ताने

सामना प्रतिनिधी । मुंबई

काव्य संमेलन… नाटय़ संमेलन… अशा अनेक संमेलनांच्या भाऊगर्दीत पहिल्यावहिल्या वर्षी ग्रंथालयाच्या संमेलनातून एक वेगळेपण अधोरेखित होतंय. वाचन संस्कृती जपण्याचे आणि अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचे काम या ग्रंथालयांनी केले. या चळवळीत शंभरी गाठलेल्या राज्यभरातील ९० ग्रंथालयांना एकत्र आणण्याचे काम ठाण्याचे मराठी ग्रंथ संग्रहालय करत आहे. येत्या रविवारी आयोजिलेल्या ग्रंथालय संमेलनानिमित्त मराठी ग्रंथ संग्रहालयाचे सचिव विद्याधर वालावलकर यांच्याशी केलेली बातचीत…

ग्रंथालयांचे संमेलन याची संकल्पना कशी सुचली
– संमेलन म्हणजे काय तर एका किशिष्ट किषयाकर एकत्र येऊन समस्या, नकीन तंत्रज्ञान कापरून काय करता येईल, आपण कसे आत्मसात कराके याबाबत केलेली सकिस्तर चर्चा … ग्रंथालयांच्या आणि त्यातही शंभरी गाठलेल्या ग्रंथालयांच्या मागण्या, अडचणी, तंत्रज्ञान, प्रत्येकाची काचन संस्कृती आणि ती टिककण्यासाठी केलेली चळकळ ही केगळी आहे. ती समजून घेण्यासाठी हा संमेलनाचा घातलेला आगळाकेगळा घाट.

संमेलनामागचे उद्दिष्ट काय?
– ग्रंथालय सांभाळणारे आणि ग्रंथालयाला भेट देणारी एक पिढी सध्याच्या डिजिटल युगापासून मैलोनमैल दूर आहे. यांना प्रकाहात सामाकून घेताना ग्रंथालयांचेही डिजिटलायझेशन होणे आकश्यक आहे. शंभरी पूर्ण केलेल्या ग्रंथालयांच्या समस्या, पुस्तकांचे जतन, त्यांना मिळणारे अल्प अनुदान, डिजिटल होण्याकडे कशी काटचाल करत येईल याबाबत बोलण्यासाठी आतापर्यंत एकही क्यासपीठ उपलब्ध झालेलं नाही… यासाठी मराठी संग्रहालयाच्या १२५ व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रंथालय चळवळीचे बहुमोल, पण दुर्लक्षित कार्य समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.

ग्रंथालयाच्या काय आहेत समस्या?
– ग्रंथालय आणि त्यात असलेल्या करीअरच्या संधी हा भाग इतका दुर्लक्षित झालाय की यामुळे ग्रंथालयाच्या कामकाजात कर्मचारी मिळेनासे झाले आहेत. त्यातच आता कम्प्युटर डिजिटलायझेशन होत असल्याने हा पर्याय वाचकांना किती रुचेल किंवा तो ग्रंथालयाने कसा राबवावा याबाबत खूपच अज्ञान आहे. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे चर्चा करण्याची गरज आहे. सर्व ग्रंथालयांना सारखे अनुदान मिळते अगदी काल सुरू झालेल्यालाही. यामुळे शंभरी पार केलेल्या ग्रंथालयांचे नुकसान होत आहे. वाङ्मय संपत्ती किती आहे ते कसे जोपासले आहे, हे पाहून अनुदान द्यावे.

संमेलनाचे नियोजन कसं असेल?
– संमेलनात तंत्रज्ञान आणि डिजिटलायजेशन हा मुख्य विषय घेऊन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सध्याची ग्रंथालये संगणकीकृत करताना येणारे आव्हान कसे पेलायचे हे सांगण्यात येणार आहे. वाचक गंथपाल आणि लेखक यांच्या बदलत्या अपेक्षा याबाबत डॉ. उदय निरगुडकर, अच्युत गोडबोले, डॉ. विजय बेडेकर, नारायण बारसे मार्गदर्शन करणार आहेत. मॉडर्न लायब्ररीचे प्रणेते डॉ. विजय बेडेकर आजची स्थिती आणि उद्याची परिस्थिती यावर मार्गदर्शन करतील.

ई-बुक्सला कसा प्रतिसाद आहे?
– तरुण वाचक वर्ग सध्या वाढतोय. पुस्तके किंवा इतर वाङ्मय या पिढीने वाचावे यासाठी नवीन ऍप्स, ई-बुक्सचा पर्याय अनिवार्यच आहे. पुस्तक हातात घेऊनच वाचावे असा हट्ट धरणे चुकीचे होईल. वेळ मिळेल तेव्हा, प्रवासात अगदी कुठेही मोबाईलवर ई-लायब्ररी घेऊन पुस्तके वाचण्यात तरुणपिढी महत्त्व देतेय.

वाचक वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न केले आहेत?
– खास घरी असणाऱया किंवा ज्यांना ई माध्यम आणि ग्रंथालयात येणे तसे शक्य नसलेल्यांसाठी ठाणे ग्रंथसंग्रहालयाने फिरते ग्रंथदालन सुरू केले आहे. यामुळे ‘ग्रंथ आपल्या दारी’ या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळतोय. आठवडय़ातील एका दिवशी आपल्या परिसरात हे ग्रंथदालन पोहोचते. आपल्या आवडीचे पुस्तक नाममात्र डिपॉझिट भरून दिले जाते. आठवडा किंवा पंधरावडय़ात हे पुस्तक परत देता येते. याला ठाणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

– utsav@saamana.com