‘शरद पवारांना बोलाविले नाही, तर वेगळी भूमिका’; महापौरांचा इशारा

66

पुणे, (प्रतिनिधी)

मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बोलाविले जाणार आहे की नाही, याबाबत उद्या (दि. २०) पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यावर तोडगा निघाला नाही, तर राष्ट्रवादीचा भूमिपूजनाचा पुढचा प्लॅन तयार असेल, असा इशाराही महापौर प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

येत्या २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यावर या कार्यक्रमाला शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करा, अशी मागणी महापौर प्रशांत जगताप यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली आहे. त्याबाबत जगताप म्हणाले, उद्या बापट यांच्याशी चर्चा होणार आहे. त्यावर तोडगा निघाला नाही, तर राष्ट्रवादीचा भूमिपूजनाचा प्लॅन तयार असेल.

आपली प्रतिक्रिया द्या