अटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता; ईडी, सीबीआयची झाडाझडती सुरू

1121

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रिय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या डोक्यावर आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर ईडी आणि सीबीआयचे पथक त्यांच्या घरी पोहोचले असून झाडाझडती सुरू आहे. परंतु अटकेच्या भितीने चिदंबरम बेपत्ता झाले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर सीबीआयचे एक पथक त्यांच्या घरी पोहोचले. परंतु त्यांना मोकळ्या हाताने परतावे लागले. अटक होण्याच्या भितीने चिदंबरम यांनी पोबारा केला असून सीबीआयने त्यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

याआधी आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी मंगळवारी पी चिंदबरम यांनी दाखल केलेल्या अटक पूर्व जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. चिंदबरम यांनी कोर्टाकडे तीन दिवसांची मुदत मागितली होती. परंतु उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा अर्ज फेटाळून लावल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या निर्णयाविरोधात चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

काय आहे प्रकरण?
चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडियासाठी फॉरेन इन्वेस्टेमेंट प्रमोशन बोर्डाकडून बेकायदेशीररित्या परवानगी देण्यासाठी 305 कोटींची लाच घेण्याचा आरोप आहे. या केसमध्ये चिंदबरम यांना 24 वेळा अटक टळली आहे. 2007 रोजी जेव्हा चिंदबरम केंद्रिय अर्थमंत्री होते तेव्हाचे हे प्रकरण आहे. या प्रकरणी सीबीआय आणि ईडीनकडून चिंदबरम पिता पुत्रांना अटक झाली होती. दोघेही आता जामीनावर बाहेर आहेत. 4 जुलै रोजी जेव्हा इंद्राणी मुखर्जीने सरकारी साक्षीदार म्हणून जवाब नोंदवला तेव्हा या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते.

आपली प्रतिक्रिया द्या