आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग, जामिनासाठी चिदंबरम सुप्रीम कोर्टात

314

आयएनएक्स मीडिया मनी लॉण्डरिंग प्रकरणात जामीन मिळावा म्हणून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याविरोधात चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

चिदंबरम 90 दिवस तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणी घ्यावी, असे चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर ‘आम्ही लक्ष घालू’, असे खंडपीठाने म्हटले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी चिंदबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणाचा तपास सध्या प्रगतीपथावर असून आता जामीन दिल्यास त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो, असे नमूद करीत हायकोर्टाने जामिनास नकार दिला.

आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी चिंदबरम यांना पहिल्यांदा 21 ऑगस्ट रोजी सीबीआयने अटक केली. याप्रकरणात 22 ऑक्टोबर रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडियाला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रोमोशन बोर्डाकडून बेकायदेशीरपण स्वीकृती मिळवून देण्याचा आरोप आहे. त्यासाठी  305 कोटींची लाच घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.  हे प्रकरण 2007 चे आहे. ज्याकेवेळी ते अर्थमंत्री होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने 2017 साली त्यांच्यावर मनी लॉण्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या