iPhone 11 वर मिळत आहे जबरदस्त ऑफर, कमी किंमतीत खरेदी करण्याची सुवर्ण संधी

iPhone 12 लॉन्च झाल्यानंतर iPhone 11 च्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. असं असलं तरी आताही हा स्मार्टफोन सर्वाधिक विक्री करणार्‍या डिव्हाइसमधील एक आहे. आपल्याला हा फोन कमी किंमतीत खरेदी करायचा असेल तर आपण फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डे सेलचा फायदा घेऊ शकता. बिग सेव्हिंग डे सेलमध्ये हा हँडसेट कमी किंमतीत उपलब्ध आहे.

फ्लिकार्टच्या बिग सेव्हिंग डे सेलमध्ये iPhone 11 44,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर एचडीएफसी बँकेला दहा टक्के सूट तर अ‍ॅक्सिस बँकेकडून पाच टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे. याशिवाय हा फोन महिन्याला 7,500 रुपयांच्या नॉन-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येऊ शकतो.

iphone 11 मध्ये 6.1 इंचाचा LCD रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 12 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे देण्यात आले असून मेन कॅमेरा वाईड अँगल लेन्स तर दुसरा कॅमेरा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स असेल. यामध्येही नाईट मोड फीचर देण्यात आले आहे. तसेच 64 fps ने याद्वारे 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येणार आहे. iphone 11 मध्येही A13 Bionic चीप देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या