iPhone 11 वर मिळत आहे मोठी सवलत; जाणून घ्या फीचर्स आणि ऑफर…

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर Great Republic Days ची सुरुवात झाली आहे. सेलमध्ये जवळजवळ सर्व स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे. यातच एक iPhone 11 चाही समावेश आहे. या फोनमध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात मागील बाजूस दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत.

iPhone 11 ची किंमत

iPhone 11 च्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत 54,900 रुपये आहे. मात्र Great Republic Days सेलमध्ये हा फोन ग्राहकांना 48,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक हा फोन रेड , ब्लॅक, येल्लो , व्हाईट आणि पर्पल रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात.

ऑफर

या डिव्हाइसवर ग्राहकांना 12,400 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळेल. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या प्राईम सदस्यांना पाच टक्के आणि नॉन-प्राइम सदस्यांना तीन टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. ग्राहक हा फोन नो-कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करू शकतात.

फीचर्स

iphone 11 मध्ये 6.1 इंचाचा LCD रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 12 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे देण्यात आले असून मेन कॅमेरा वाईड अँगल लेन्स तर दुसरा कॅमेरा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स असेल. यामध्येही नाईट मोड फीचर देण्यात आले आहे. तसेच 64 fps ने याद्वारे 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येणार आहे. iphone 11 मध्येही A13 Bionic चीप देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या