चीन-अमेरिका वादाचा हिंदुस्थानला फायदा, देशात ऍपल आयफोन-11चे उत्पादन सुरू, होणार ‘एवढा’ फायदा

ऍपल कंपनीने हिंदुस्थानमध्ये आयफोन-11 चे उत्पादन सुरू केले आहे. चेन्नईमध्ये फॉक्सकॉनद्वारे याचे उत्पादन सुरू करण्यात आल्याचे ‘द इकोनॉमिक्स टाइम्स’ने म्हटले आहे. फॉक्सकॉन ही ऍपल कंपनीच्या टॉप-3 उत्पादकांमधील प्लांटमधील एक आहे. याच प्लांटमध्ये आयफोन एक्सआर याचे देखील उत्पादन होते. या ठिकाणी हळूहळू आता अन्य ऍपल कंपनीचे उत्पादन घेऊन भविष्यात चीनवरील अवलंबवत्व कमी करण्यात येणार आहे. तसेच येथून आयफोन-11 ची निर्यात देखील केली जाईल.

ऍपल कंपनी देशात आयफोन-11 चे उत्पादन घेत आहे ही हिंदुस्थानसाठी मोठी गोष्ट आहे. यामुळे देशातील आयफोन-11 च्या किंमती जवळपास 22 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे युजर्सच्या खिशावर पडणारा भार कमी होईल. सध्या आयफोन-11 कॅज्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 68 हजात 300 तर, 256 जीबी
व्हेरिएंटची किंमत 84 हजार 100 आहे. तर 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 73 हजार 600 रुपये आहे.

चीन-अमेरिका वादाचा फायदा
अमेरिकन कंपन्या आपला मोर्चा हिंदुस्थानकडे वळवत आहे याला एक कारण चीनसोबत सुरू असलेला वाद हे आहे. चीनला आर्थिक मोर्च्यावर घेरण्यासाठी अनेक कंपन्या हिंदुस्थानमध्ये येण्यास उत्सुक आहेत. तसेच ऍपल कंपनी देखील चीनवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी जास्तीत-जास्त चीनबाहेर आयफोनचे उत्पादन करत आहे. याचाच फायदा हिंदुस्थानला मिळत आहे. तसेच जगातील दुसरी सर्वात मोठी आयफोन उत्पादक कंपनी पेगाट्रॉन देखील हिंदुस्थानमध्ये लोकल असेंम्बली स्थापन करणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या