स्मार्टफोनला ‘आयफोन’चा लूक

26

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्याकडे एखाद्या मोठ्या कंपनीचा ब्रँडेड आयफोन असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत आयफोन मिळणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना तो खरेदी करता येत नाही. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवावी लागते या म्हणीप्रमाणे देशी, विदेशी कंपन्या स्मार्टफोनलाच आयफोनचा लूक देत असल्यानं हे मोबाईल ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

बाजारात आयफोनची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे, मात्र तसा फोन आपल्या खिशात असावा असं प्रत्येकाला वाटतं, त्यामुळे विवो, आयफॅड, रेडमी-३, रेडमी-नोट३, एचटीसी ए-९ यासह अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनला आयफोनचा लूक देत आहेत. हे मोबाईल सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत. त्यामुळे असे आयफोनच्या लूकसारखे स्मार्टफोन वरच्या खिशात ठेवून समोरच्यावर छाप पाडली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या