दिल्लीच्या संजू सॅमसनचं वादळी शतक

26

सामना ऑनलाईन । पुणे

रायझिंग पुणे सुपरजायंट आणि दिल्ली डेअरडेविल्समधील सामन्यात दिल्लीच्या संजू सॅमसननं वादळी खेळी करत शतक साजरं केलं आहे. पुण्याच्या गोलंदाजांचा समाचार घेत संजूनं ६३ चेंडूत १०२ धावा केल्या. संजूनं या शतकी खेळीत ५ उत्तुंग षटकार आणि ८ आकर्षक चौकार लगावले. पुण्याचे सर्व गोलंदाज संजू सॅमसनपुढे निष्प्रभ ठरले. संजूच्या या वादळी खेळीमुळे दिल्लीच्या संघाला २० षटकांत ४ बाद २०५ धावांचा डोंगर उभारता आला. संजूचं हे पहिलंच टी-ट्वेंटी शतक आहे. शेवटच्या षटकांत मॉरिसनं ९ चेंडूत ३८ धावांची आतषी खेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या