मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर, रोहित तंदुरुस्त

9

सामना ऑनलाईन । मुंबई

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी खुशखबर आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमधून सावरला आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र आता रोहित पहिल्या सामन्यापासून आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रायझिंग पुणे सुपर जायंट्ससोबत ६ एप्रिलला होणार आहे.

रोहित शर्मानं पहिल्या सामन्यापासून उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. ”दुखापतीमुळे सामन्याला मुकणे म्हणजे दु:खद गोष्ट आहे, मात्र आता संघासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी तयार आहे” असंही रोहितनं म्हटलं आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरोधात खेळताना रोहितला दुखापत झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या