चेन्नई समोर दिल्लीचं १६५ धावांचं आव्हान

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली डेअरडेविल्ससमोर १६५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईने टॉस जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं होते. विजय शंकर आणि हर्षल पटेल या जोडीच्या ६५ धावांच्या भागिदारीच्या जोरावर दिल्लीला १६५ धावांचा पल्ला गाठता आला. कारण दिल्लीची परिस्थिती ५ बाद ९७ अशी झाली होती, त्यावेळी या दोन युवा फलंदाजांनी दिल्लीचा डाव सावरला. रिषभ पंतने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर विजय शंकरने सामन्यात २८ चेंडूत ३६ धावा केल्या आणि हर्षल पटेलने १६ चेंडूत ३६ धावा केल्या.

चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली डेअर डेविल्स यांच्यातील सामना प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. कारण चेन्नई आधीच प्ले ऑफसाठी क्लालिफाय झाली आहे, तर दिल्लीचं प्ले ऑफसाठीचं आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. मात्र हा सामना जिंकून उरली सुरली प्रतिष्ठा कायम राखण्याची संधी दिल्लीला आहे.