रशिदसाठी काय पण… सीमापार आयपीएल फायनलचा धुमधडाका

50

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयपीएल फायनलचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रीडा रसिकांना आहे. हिंदुस्थानसह विदेशातही या क्रीडा स्पर्धेचा जलवा दिसत आहे. आपल्या आवडत्या स्टार खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांची मैदानावर रिघ लागली. तसेच मैदानाबाहेरही चाहत्यांचा उत्साह दिसून येत आहे.

…म्हणून अंतिम सामन्यात पोहचूनही धोनी आहे नाराज

सध्या अफगानिस्तानमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक समस्यांमध्ये घेरलेल्या अफगानिस्तानातील या फोटोमध्ये जमिनीवर टीव्ही ठेवल्याचे दिसत आहे. मैदानामध्ये ठेवलेल्या या टीव्हीला घेरून लोकं बसलेली दिसत आहे. यात काही खेळाडू आहेत आणि हैदराबादचा स्टार खेळाडू रशिद खानचे मित्रही दिसत आहेत. आपल्या आवडत्या हिरोला सीमापार बसून बघण्यासाठी या चाहत्यांचा उत्साह ओतू जाताना दिसत आहे. अफगानिस्तानच्या खेळाडूने हा फोटो शेअर केला आहे.

जगभरातील खेळाडूंना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणाऱ्या रशिदने अफगानिस्तानच्या नागरिकांना आनंदी होण्याचे नवे कारण दिले आहे. सतत दहशतीच्या छायेखाली असणाऱ्या अफगानिस्तानी नागरिकांनी त्याच्या खेळाला डोक्यावर घेतले आहे. फक्त १९ वर्षीय या खेळाडूला पाहण्यासाठी भर मैदानात टीव्ही लावून बसले आहेत.

रशिद खानने आयपीएलमध्ये एकूण २१ बळी घेतले आहेत. दुसऱ्या क्लालिफायर सामन्यात त्याने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही जलवा दाखवला होता. रशिदने प्रथम १० चेंडूत ३४ धावा टोलवत हैदराबादला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर गोलंदाजीत १९ धावात तीन बळी घेत कोलकाताच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तसेच रशिदने एक रनआऊट आणि दोन कॅचही घेतले. रशिदच्या या खेळीच्या जोरावर हैदराबादने फायनलमध्ये धडक मारली.

आपली प्रतिक्रिया द्या