आयपीएल २०१८ : फायनलचा ‘नंबर गेम’

104

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयपीएल २०१८ चा शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघामध्ये रविवारी वानखेडे मैदानावर रंगणार आहे. चेन्नईने पहिल्या क्लालिफायर सामन्यात हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता, तर शुक्रवारी कोलकाताचा पराभव करत हैदराबादने फायनल गाठली आहे. चेन्नईला २०११ नंतर पहिल्यांदा आयपीएल जिंकण्याची संधी आहे.

हैदराबाद दुसऱ्यांदा चषक जिंकणार?

sunrisers-hydrabad0

दुसरीकडे दोन वर्षानंतर आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघासमोर चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे. या सामन्यात हैदराबादची गोलंदाजी विरुद्ध चेन्नईची फलंदाजी असा सामना रंगणार आहे. २०१६ मध्ये झालेल्या फायनलमध्ये हैदराबादने बंगळुरुचा पराभव करत पहिल्यांदाच आयपीएल चषक उंचावला होता.

चेन्नईची सातवी फायनल

csk-team-2018

चेन्नई सुपर किंग्ज सातव्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. हैदराबादचा पराभव केल्यास चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल चषक उंचावेल. मुंबईनेही तीन वेळी आयपीएल चषक जिंकला असून चेन्नईचा संघ मुंबईच्या विक्रमाची बरोबरी करेल. चेन्नईने यापूर्वी २०१० आणि २०११ मध्ये दोन वेळा सलग आयपीएल जिंकण्याची कामगिरी केली होती.

धोनी @५००

dhoni-in-csk

जबरदस्त फॉर्मात असलेला चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी ५०० धावांच्या जवळ पोहोचला आहे. आतापर्यंत धोनीने १५ सामन्यात फलंदाजी करताना ३ अर्धशतकांसह ४५५ धावा ठोकल्या आहेत. धोनीने फायनलमध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडल्यास चेन्नईच्या विजयाची आशा उंचावणार आहे.

विलियम्सन @७००

kane-willi

आयपीएलमधील ऑरेंज कॅपधारक हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन यंदाच्या सत्रात चांगलाच फॉर्मात आहे. विलियम्सनच्या नावावर सध्या ६८८ धावा असून तो ७०० धावांचा उंबरठ्यावर आहे. फायनलमध्ये विलियम्सनचा बॅटचा तडाखा चेन्नईला बसल्यास त्यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत.

रशिदची पर्पल कॅपकडे धाव

rashid-khan1

हैदराबादचा मिस्ट्री स्पिनर रशिदने आपल्या फिरकीच्या जोरावर संघाला फायनलमध्ये पोहोचवले आहे. गोलंदाजीसह फलंदाजीतही त्याने दमदार कामगिरी केली आहे. १६ सामन्यात २१ बळी घेणारा रशिद पर्पल कॅपपासून फक्त ३ विकेट्स दूर आहे. पंजाबच्या टायच्या नावावर २४ बळी आहेत.

रैनाला ५ हजारी मनसबदारी मिळणार

suresh-raina

चेन्नईचा सर्वाधिक आश्वासक खेळाडू आणि प्रत्येक सत्रात धावांचा पाऊस पाडणारा सुरेश रैना ५ हजार धावांच्या जवळ पोहोचला आहे. रैनाच्या नावावर १७५ सामन्यात ४९५३ धावांची नोंद आहे. आणखी ४७ धावा केल्यास तो हा जादूई आकडा गाठू शकेल.

धवन सहा हजारच्या जवळ

dhavan-srh0

हैदराबादचा सलामीवीर शिखर धवनच्या नावावर ५९५६ धावांची नोंद आहे. २१२ टी-२० सामन्यात त्याने हा टप्पा गाठला आहे. सहा हजार धावांपासून तो फक्त ४४ धावा दूर आहे. धवनने ६ हजार धावांचा टप्पा ओलांडलास अशी कामगिरी करणारा तो सहावा हिंदुस्थानी खेळाडू असेल.

आपली प्रतिक्रिया द्या