आयपीएलमध्ये रॉस बटलरने केली विराटशी बरोबरी

सामना ऑनलाईन । जयपूर

या आयपीएलमध्ये ड्रीम फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरसाठी शुक्रवारचा दिवस खास होता. बटलरच्या ९५ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला. बटलचे या आयपीएलमधील हे सलग चौथे अर्धशतक होते.

बटलरने चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी दिल्ली डेअरडेविल्स विरोधात एक आणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरोधात २ दोन अर्धशतकं झळकावली होती. बटलरने चेन्नईविरोधात अर्धशतक झळकावल्यानंतर विराट कोहलीशी बरोबरी केली आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने २०१६ च्या आयपीएलमध्ये सलग ४ अर्धशतकं ठोकली होती. विराटने आयपीएल-२०१६मध्ये १६ सामन्यात ४९५ धावा ठोकल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक सलग अर्धशतकं वीरेंद्र सेहवागच्या नावे असून, सेहवागने सलग ५ अर्धशतकं झळकावली आहेत.