IPL 2019 मुंबईची दुसऱ्या स्थानावर झेप

hardik-pandya-ipl-mumbai

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

रोहित शर्मा व क्विण्टॉन डी कॉकची आणखी एक दमदार सुरुवात… हार्दिक पांडय़ाची शानदार फिनिशिंग… कृणाल पांडय़ाची अष्टपैलू चमक… अन् राहुल चहर, जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घराच हरवत वानखेडेवर झालेल्या पराभवाचा वचपा काढला आणि आयपीएलमधल्या सहाव्या विजयाला गवसणी घातली. या विजयासह रोहित शर्माच्या ब्रिगेडने 12 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या 169 धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ (20 धावा), शिखर धवन (35 धावा) व अक्षर पटेल (26 धावा) यांचा अपवाद वगळता दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. दरम्यान, याआधी रोहित शर्मा (30 धावा), क्विण्टॉन डी कॉक (35 धावा), कृणाल पांडय़ा (नाबाद 37 धावा) व हार्दिक पांडय़ा (32 धावा) यांनी दमदार फलंदाजी केली.