IPL 2020 – दुबईमध्ये होणार आयपीएलच्या जेतेपदाचा फैसला, महिला टी-20 चॅलेंजच्या लढती शारजाहमध्ये रंगणार

बीसीसीआयकडून रविवारी आयपीएलच्या प्ले ऑफ लढतींचे तसेच महिला टी-20 चॅलेंज या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. येत्या 10 नोव्हेंबरला आयपीएलच्या जेतेपदाचा फैसला दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. तसेच क्वॉलिफायर वन ही लढतही दुबईत येथे पार पडणार आहे. अबुधाबी येथे एलिमिनेटर व क्वॉलिफायर टू या दोन लढती खेळवण्यात येतील.

साखळी फेरीच्या लढतींमध्येही दुबईचेच वर्चस्व

आयपीएलच्या साखळी फेरीच्या लढतींमध्येही दुबई येथील स्टेडियमचेच वर्चस्व होते. दुबईमध्ये 24, अबुधाबीमध्ये 20 आणि शारजाहमध्ये 12 साखळी फेरींचे सामने होत आहेत. आता आयपीएलमधील फायनलची लढतही दुबई येथेच होणार आहे.

सलं संघटनांमधील एकाला फायनलसाठी परवानगी

आयपीएलमधील साखळी फेरीच्या लढतींसाठी बीसीसीआयच्या सलंग्न संघटनांमधील पदाधिकाऱयांना प्रवेश देण्यात आला नव्हता. सलंग्न संघटनांमधील एका पदाधिकाऱयाला फायनलसाठी बीसीसीआयकडून परवानगी देण्यात आली आहे.

महिला टी-20 चॅलेंज 5 नोव्हेंबरपासून

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचा थरार 5 नोव्हेंबरपासून शारजाह येथे रंगेल. वेलोसिटी, ट्रेलब्लेझर्स व सुपरनोवास या तीन संघांमध्ये ही मालिका होणार आहे. 10 नोव्हेंबरला या स्पर्धेचा विजेता ठरेल.

प्ले ऑफ लढतींचे वेळापत्रक

5 नोव्हेंबर – क्वॉलिफायर वन लढत, दुबई (रात्री 7.30 वा.)
6 नोव्हेंबर – एलिमिनेटर लढत, अबुधाबी (रात्री 7.30 वा.)
8 नोव्हेंबर -क्वॉलिफायर टू लढत, अबुधाबी (रात्री 7.30 वा.)
10 नोव्हेंबर – अंतिम फेरीची लढत, दुबई (रात्री 7.30 वा.)

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचे वेळापत्रक

4 नोव्हेंबर – सुपरनोवास – वेलोसिटी, शारजाह (रात्री 7.30वा.)
5 नोव्हेंबर – वेलोसिटी – ट्रेलब्लेझर्स, शारजाह (रात्री 7.30 वा.)
7 नोव्हेंबर – ट्रेलब्लेझर्स – सुपरनोवास, शारजाह (रात्री 7.30 वा.)
9 नोव्हेंबर – अंतिम फेरीची लढत, शारजाह (रात्री 7.30 वा.)

आपली प्रतिक्रिया द्या