IPL 2020 – सट्टा बाजारात ‘हा’ संघ फेव्हरेट, जाणून घ्या बुकींची कोणाला पसंती अन काय आहे भाव?

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम उद्या शनिवारपासून सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघात पहिला सामना रंगणार आहे. बऱ्याच कालावधी नंतर खेळाडू मैदानात उतरणार असून क्रीडा प्रेमी याचा आनंद लुटण्यासाठी सज्ज आहेत. 10 नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेवर क्रीडा प्रेमीच नाही तर सट्टा बाजाराचेही लक्ष आहे. या काळात कोट्यवधी रुपयांची उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

IPL 2020 – कोहलीचा ‘विराट’ विक्रम, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा कर्णधार

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सट्टा बाजारात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला बुकींची पसंती मिळत आहे. मुंबईने 4 वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे, त्यामुळे सट्टा बाजारात मुंबईवर डाव खेळला जाईल. तसेच सट्टेबाज रोहित शर्माला आपला पसंतीचा खेळाडू सांगत आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैद्राबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज संघही सट्टा बाजारात फेव्हरेट आहे.

Photo – 2008 ते 2019, एका क्लिकवर वाचा विजेत्यांची व मालिकावीरची यादी

आयपीएलमध्ये कोणत्या संघाला किती भाव मिळतोय याबाबत एका सट्टेबाजाने नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले की, मुंबई इंडियन्स सध्या फेव्हरेट आहे. मुंबईचा भाव 4.90 रुपये आहे. यानंतर सनरायझर्स हैद्राबादला 5.60 रुपये भाव मिळत आहे. यानंतर चेन्नईचा संघ असून चेन्नईला 6.20 रुपये, दिल्ली कॅपिटल्सला 6.40 रुपये, कोलकाता नाईट रायडर्सला 7.80 रुपये, पंजाबला 9.50 रुपये आणि राजस्थानला 10 रुपये भाव मिळत आहे, असे सट्टेबाजाने सांगितले. दरम्यान, ज्या संघाचा भाव सर्वात कमी तो संघ विजयी होण्याची शक्यता जास्त असे सट्टा बाजाराचे गणित असते. याचाच अर्थ सट्टा बाजारात मुंबई ‘हॉट’ सीटवर आहे.

IPL 2020 – आयपीएलमधील ‘अविश्वसनीय’ झेल, खेळाडूंची चपळता पाहून व्हाल अवाक

आता यामागील गणित काय आहे पाहूया. जर कोणी मुंबई इंडियन्सवर 1000 हजार रुपये लावले आणि मुंबईचा संघ विजयी झाल्यास त्याला 4,900 रुपये मिळतील, तर राजस्थान रॉयल्सच्या संघावर 1000 रुपये लावल्यास आणि राजस्थानने स्पर्धा जिंकल्यास त्याला 10,000 रुपये मिळतील. तसेच जशी-जशी स्पर्धा पुढे सरकेल, तशी तशी ही किंमत कमी-जास्त होते. दरम्यान, हिंदुस्थानमध्ये सट्टा अवैध असला तरी या ना त्या मार्गाने कोट्यवधी रुपयांची उलथापालथ या काळात होते.

IPL 2020 – राजस्थानचे ‘रॉयल’ दिवस पुन्हा येतील का? दिग्गज खेळाडूंच्या सहभागावर सवाल

आपली प्रतिक्रिया द्या