IPL 2020 – चेन्नई सुपर किंग्जला जबरदस्त धक्का, अंबाती रायडूला गंभीर दुखापत

चेन्नई सुपर किंग्जसमोरील आव्हान कमी होण्याचे नाव नाही. आयपीएल सुरू होण्यापूर्वी स्टार फलंदाज सुरेश रैना आणि आघाडीचा फिरकीपटू हरभजन सिंग यांनी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता मधल्या फळीतील खेळाडू अंबाती रायडू (Ambati Rayudu) याला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे. दुखापतीमुळे अंबाती रायडू दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या आगामी लढतीत खेळताना दिसणार नाही.

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघात झालेल्या लढतीत अंबाती रायडू अंतिम 11 खेळाडूत नव्हता. आता टीम मॅनेजमेंटने त्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले आहे. ‘झी न्यूज’मे याबाबत वृत्त दिले आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ‘रायडू हॅमस्ट्रिंग (गुडघेदुखी) दुखपतीने त्रस्त आहे. त्यामुळे तो आणखी एक सामना खेळू शकणार नाही. यानंतर मात्र तो मैदानात उतरण्यास तयार असेल.’ चेन्नईला आता दिल्लीविरुद्ध सामना झाल्यानंतर आगामी सामना एक आठवड्याने 2 ऑक्टोबरला खेळायचा आहे. या कालावधीत रायडू दुखापतीतून सावरेल अशी आशा आहे.

दरम्यान, रैनाच्या अनुपस्थित मधल्या फळीचा भार सांभाळणाऱ्या रायडूने सलामीच्या लढतीत दमदार खेळी केली होती. 2 गडी बाद झाल्यानंतर त्याने डु प्लेसिस सोबत 100 धावांची भागीदारी करत संघाला विजयासमीप आणले. बाद होण्यापूर्वी त्याने 71 धावा केल्या. या खेळीच्या बळावर चेन्नईच्या संघाने पहिला सामाना मुंबईविरुद्ध 5 विकेट्सने जिंकला होता. रायडूला सामनावीर पुरस्कार ददेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या