IPL 2020 – चेन्नईला अजूनही ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्याची संधी, असे आहे गणित

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत शुक्रवारी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाशी होणार आहे. मुंबईचा संघ 12 गुण घेऊन तिसऱ्या तर चेन्नईचा 6 गुणांसह तळाशी आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफ खेळणार हे जवळपास पक्के आहे. मात्र चौथ्या स्थानासाठी घमासान सुरू आहे.

सर्वांच्या नजरा प्रत्येक आयपीएलमध्ये प्ले ऑफ गाठणाऱ्या चेन्नईच्या संघावर आहे. गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या चेन्नईचा रनरेट -0.463 आहे. यामुळे चाहते निराश झाले आहेत. मात्र असे असूनही चेन्नईला प्ले ऑफ गाठण्याची संधी आहे. काय आहे हे गणित समजून घेऊया…

चेन्नईच्या उर्वरित लढती

चेन्नई सुपर किंग्जला आजचा मुंबई विरुद्धचा सामना धरून 4 लढती खेळायच्या आहेत. चेन्नईला मुंबई इंडियन्स (23 ऑक्टोबर), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (25 ऑक्टोबर), कोलकाता नाईट रायडर्स (29 ऑक्टोबर) आणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध (1 नोव्हेंबर) मैदानात उतरायचे आहे.

विना रनरेटने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा

– चेन्नईला आगामी सर्व चारही लढतीत विजय मिळवावा लागणार आहे.

– तसेच टॉप तीनवर असणारे संघ मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूने आपल्या आगामी सर्वच लढतीत (चेन्नई विरुद्धच्या सोडून) विजय मिळवणे आवश्यक.

– तसेच या टॉप 3 संघाचा आपापसात होणाऱ्या लढतीचा चेन्नईच्या स्थानावर परिणाम होणार नाही.

– केकेआरने आगामी 4 लढतीत फक्त 1 सामना जिंकल्यास चेन्नई अंतिम 4 संघात स्थान मिळवू शकेल.

– तसेच सनरायझर्स हैद्राबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सला 2 पेक्षा जास्त विजय मिळू नये अशी प्रार्थना चेन्नईला करावी लागेल.

– सर्व काही वरील गणिताप्रमाणे झाल्यास चेन्नईच्या खात्यात 14 गुण जमा होतील आणि नेट रनरेटच्या जोखडात न अडकता प्ले ऑफमध्ये जाईल.

नेट रनरेटने निर्णय झाल्यास…

– अनेक संघाचे 14 गुण झाल्यास चेन्नईला नेट रनरेटच्या मदतीने प्ले ऑफ गाठण्याची देखील संधी आहे.

– चेन्नईला आगामी 4 लढतीत विजय मिळवला लागेल, तसेच यातील कमीत कमी दोन लढती मोठ्या अंतराने (धावा किंवा विकेट्स किंवा षटक) जिंकाव्या लागतील.

मुंबई विरुद्ध पराभव झाल्यास काय?

शुक्रवारी मुंबई विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला तरी चेन्नई स्पर्धेतून बाहेर होणार नाही. 12 गुणांसह देखील प्ले ऑफ गाठण्याची संधी धोनीच्या संघाकडे असेल. जसे गेल्या वर्षी सनरायझर्स हैद्राबादने क्वालिफाय केले होते.

IPL 2020 – राजस्थानविरुद्ध विजयी अर्धशतक ठोकूनही शंकरच्या नावावर लाजिरवाणा विक्रम जमा

मात्र हे एवढे सोपे असणार नाही. चेन्नईला उर्वरित 3 लढती मोठ्या फरकाने जिंकाव्या लागतील, तसेच इतर संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे उर्वरित सर्व 4 लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळवून प्ले ऑफ गाठण्याची संधी तुलनेने सोपी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या