IPL 2020 – ‘युनिव्हर्सल बॉस’ची जादुई कामगिरी, टी-20 मध्ये 1000 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम

वेस्ट इंडिजचा विस्फोटक खेळाडू ख्रिस गेल याने टी-20 क्रिकेटमध्ये 1000 षटकार पूर्ण केले आहे. शुक्रवारी गेलने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 99 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 8 षटकारांची आतिषबाजी केली.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी ख्रिस गेल याला 1000 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी 22 षटकार हवे होते. सुरुवातीच्या काही लढतीत बाहेर बसलेला गेल जवळपास अर्ध्या सिझननंतर मैदानात उतरला. पहिल्याच लढतीत अर्धशतक ठोकत त्याने आपला जलवा दाखवला.

ख्रिस गेल संघात आल्यापासून पंजाबचे नशीब देखील फळफळले आहे. पंजाबच्या संघाने सलग 5 विजय मिळवत प्ले ऑफच्या रेसमध्ये स्वतःला कायम ठेवले.

जगभरातील टी-20 लीग खेळणाऱ्या गेलच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीत 100 हुन अधिक षटकारांची नोंद आहे. तसेच आयपीएलमध्ये 300 हुन जास्त षटकार ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 15 हजारांहून अधिक धावा आहेत.

दरम्यान, टी-20 क्रिकेटमध्ये षटकार ठोकण्याच्या यादीत ख्रिस गेलच्या आसपास देखील कोणी आहे. वेस्ट इंडिजचा किरोन पोलार्ड या यादीत दुसऱ्या स्थानावर असून त्याने 660 हुन अधिक षटकार ठोकले आहेत. त्यामुळे येत्या काळात गेलचा हा विक्रम मोडणे सध्या तरी अशक्य वाटत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या