IPL 2020 – दिल्लीच्या नावावर अजब विक्रम, चेन्नईला 3 देशात पराभवाचे पाणी पाजणारा पहिला संघ

शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर 44 धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने अजब विक्रम आपल्या नावे केला. चेन्नईच्या संघाला तीन वेगवेगळ्या देशात पराभवाचे पाणी पाजणारा दिल्ली पहिला संघ ठरला आहे.

दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 175 धावा चोपत चेन्नईसमोर 176 धावांचे आव्हान ठेवले. चेन्नईच्या संघाला हे आव्हान पेलवले नाही आणि त्यांचा संघ 131 धावाच करू शकला. दिल्लीच्या संघाने 44 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने यूएईमध्ये चेन्नईच्या संघाला पहिल्यांदा पराभूत केले आहे. याआधी 2014 ला झालेल्या लढतीत चेन्नईने दिल्लीला पराभूत केले होते.

IPL 2020 – सहकाऱ्यांना खेळताना पाहून ढसाढसा रडायचा ‘हा’ खेळाडू, द्रविडच्या सल्ल्याने बदललं आयुष्य

2009 ला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलमध्ये दोन्ही संघाने एक-एक लढत जिंकली होती. तसेच हिंदुस्थानमध्ये घरच्या मैदानावर दिल्लीने चेन्नईला पराभूत केले आहे. अशा पद्धतीने तीन वेगवेगळ्या देशात चेन्नईला आयपीएलमध्ये पराभूत करणारा दिल्ली पहिला संघ ठरला आहे.

काही खास गोष्टी

– चेन्नईचा फलंदाज फाफ डु प्लेसिस याने आयपीएलमध्ये आपल्या 2000 धावा पूर्ण केल्या.

– दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ शून्यावर असताना धोनीने विकेटमागे त्याचा झेल घेतला मात्र कोणीही अपील केली नाही. यानंतर त्याने 64 धावांची खेळी केली।

– दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याचा विकेटमागे हवेत सूर मारत धोनीने कॅच घेतला. सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या