
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये रविवारी झालेला सामना दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये जिंकत किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला. मात्र पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे पंजाबला हा सामना गमवावा लागला. पंचांनी एक रन शॉर्ट दिल्याने हा सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच्या संघाने बाजी मारली.
IPL 2020 – रोहित शर्माचे अनोखे ‘द्विशतक’, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा खेळाडू
दिल्लीने दिलेल्या 158 धावांचा पाठलाग करताना पंजाबला अखेरच्या 10 चेंडूत 21 धावा हव्या होत्या. रबडाच्या षटकात दुसऱ्या चेंडूवर मयांक अग्रवालने चौकार लगावला. पुढचा चेंडू यॉर्कर होता. हा चेंडू मिड ऑनला टोलवून अग्रवाल आणि जॉर्डन यांनी दोन धावा घेतल्या. मात्र लेग हंपायर नितीन मोहन यांनी 1 रन शॉर्ट दिला. परंतु टीव्ही रिप्लेमध्ये खेळाडूने बॅट क्रिजच्या आत टेकवल्याचे स्पष्ट दिसले.
IPL 2020 – सर्वाधिक वेळा रनआउट झालेले टॉप 5 खेळाडू, ‘या’ चपळ खेळाडूचे नाव वाचून व्हाल अवाक
पंचांनी दिलेल्या या चुकीच्या निर्णयामुळे पंजाबला अखेरच्या षटकात 12 ऐवजी 13 धावा करण्याचे लक्ष्य मिळाले. मयांक अग्रवाल याने चौकार, षटकार लगावत 12 धावा काढल्या, मात्र अखेरच्या दोन चेंडूवर दोन विकेट्स गेल्याने सामना टाय झाला आणि सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने पंजबला हरवलं. जर पंचांनी तो रन शॉर्ट दिलाच नसता तर पंजाबने लढत आरामात जिंकली असती अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
ही तर लठ्ठ क्रिकेटपटूंची लीग, कोरोना व लॉकडाऊनमध्ये फिटनेसकडे कानाडोळा
याआधी दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 157 धावा करत पंजाबपुढे 158 धावांचे आव्हान ठेवले. दिल्लीकडून मार्कस स्टॉयनिस याने 21 चेंडूत तडाखेबाज 53 धावांची अर्धशतकीय खेळी केली, तर कर्णधार श्रेयस अय्यर याने 39 आणि ऋषभ पंत याने 31 धावांचे योगदान दिले.
दिल्लीच्या संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 20 षटकात 8 बाद 157 धावा करू शकला. मयांक अग्रवालने 89 धावांची झुंजार खेळी केली. मात्र विजयासाठी 2 चेंडूत 1 धाव बाकी असताना तो बाद झाला आणि अखेरच्या चेंडूवर जॉर्डनही बाद झाल्याने सामना टाय झाला.