IPL 2020 – ना मुंबई, ना चेन्नई, ‘हा’ संघ मारणार बाजी, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामाचा बिगुल वाजला असून पहिल्या दोन लढतीही रोमांचक झाल्या. शुभारंभ लढतीत चेन्नईच्या संघाने मुंबईला, तर रविवारी झालेल्या लढतीत सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने पंजाबचा पराभव केला. स्पर्धेची आत्ता कुठे सुरुवात झाली असली आतापासूनच कोण होणार चॅम्पियन याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यात आता इंग्लंडचा माजी खेळाडू मॉन्टी पानेसर (Monty Panesar) एक भविष्यवाणी केली आहे.

IPL 2020 – कोहलीचा ‘विराट’ विक्रम, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा कर्णधार

स्पर्धेत चेन्नईची सुरुवात आणि मुंबईचा रेकॉर्ड पाहता या दोन संघाला विजयाचा दावेदार मानले जात आहे. मात्र इंग्लंडच्या माजी खेळाडूचे मत वेगळे आहे. मॉन्टी पानेसर याने यंदा कोणता संघ बाजी मारेल, कोण प्ले ऑफमध्ये जाईल, कोणता खेळाडू पर्पल आणि ऑरेंज कॅप जिंकेल याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. WION News शी बोलताना त्याने याबाबत भविष्यवाणी केली आहे.

IPL 2020 – सोशल मीडियावर पांड्याची उडतेय खिल्ली, ‘हे’ 10 खेळाडूही झालेत ‘हिटविकेट’

आयपीएल 2020 च्या प्ले ऑफमध्ये राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे 4 संघ जातील असे मॉन्टी पानेसर याने म्हटले. यात दिल्लीचा संघ वरचढ ठरेल आणि स्पर्धा जिंकेल असेही तो म्हणाला. या संघात अनुभवी, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्थानिक खेळाडू यांचे चांगले संतुलन असल्याने त्याने या संघावर डाव खेळला आहे. यासह रशीद खान पर्पल कॅप आणि ऋषभ पंत ऑरेंज कॅपवर दावा ठोकेल असेही मॉन्टी पानेसर याने सांगितले.

IPL 2020 – 437 दिवसांनी मैदानात उतरलेल्या धोनीचा पराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार व विकेटकीपर

आपली प्रतिक्रिया द्या