Video – IPL 2020 CSK vs RR धोनी भडकला, मैदानात घातली पंचांशी हुज्जत

मंगळवारी IPL 2020 मध्ये राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 216 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना चेन्नईच्या ( Chennai Super Kings ) संघाला फक्त 200 धावाच करता आल्या. फाफ डु प्लेसिस, शेन वॉट्सन, सॅम कुरेन आणि धोनीने संघाला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. चेन्नईच्या संघाला 6 बाद 200 धावांपर्यंतच मजल मारता आली. या स्पर्धेतील चेन्नईचा हा पहिला पराभव आहे.

steve-smith-rajasthan-royals

  1. IPL 2020 स्पर्धेत मंगळवारी चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुकाबला झाला. ऐरवी शांत असणारा धोनी संतापलेला पाहायला मिळाला. त्याने मैदानात पंचांशी हुज्जतही घातली

deepak-chahar-resize

2.18 व्या षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर राजस्थान रॉयल्सचा टॉम कुरेनला मैदानातील पंच शम्सुद्दीन यांनीबाद ठरवले होते.

csk-wicket-celebration

3. राजस्थान रॉयल्सकडे रिव्ह्यूचा पर्याय शिल्लक नव्हता आणि कुरेन तंबूत परतत होता, यावेळी शम्सुद्दीन यांना आपला निर्णय चुकीचा वाटल्याने त्यांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. यामुळे धोनी भडकला होता

dhoni-csk-wicketkeeper

4. बाद झाल्याची दृश्ये परत पाहिल्यानंतर धोनीने झेल टीपण्यापूर्वी चेंडूने टप्पा खाल्ल्याचे दिसत होते. ज्यामुळे तिसऱ्या पंचाने कुरेनला नाबाद ठरवले.

sam-curran-csk

5. मंगळवारी झालेल्या या लढतीत राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्जचा16 धावांनी पराभव केला.

धोनी आणि पंचांमध्ये झालेल्या हुज्जतीचा व्हिडीओ पाहा

आपली प्रतिक्रिया द्या