#IPL2020 – आयपीएलचा अंतिम सामना मुंबईत रंगणार, तारखेची घोषणा

4612

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धा 29 मार्चपासून सुरू होणार असून या स्पर्धेचा अंतिम मुंबईत होणार असल्याची घोषणा करण्यात आली. आयपीएलचा हा 13 वा हंगाम असून या निमित्त झालेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष, माजी खेळाडू सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि बीसीसीआयचे पदाधिकारी उपस्थित होते.

आयपीएल 2020 मध्ये पाच दिवस फक्त दोन सामने खेळवले जाणार आहेत (दुपारी 4 ते 8 यावेळेत), तर डे-नाईट सामना रात्री आठ वाजता सुरू होईल. आयपीएलमध्ये डे-नाईट सामन्याची वेळ 8 ऐवजी 7.30 करण्याचा प्रस्ताव होता. परंतु सोमवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तसेच आयपीएलमधील फायनल मॅच अहमदाबाद येथील मैदानात होणार अशीच चर्चा होती. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने फायनल सामना 24 मे रोजी मुंबईत होणार असल्याचे स्पष्ट केले.

“आयपीएल सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. आधीप्रमाणेच सामने रात्री 8 वाजता सुरु होतील. रात्री साडेसात वाजता सामने सुरु करण्याबद्दल चर्चा झाली, पण त्यावर एकमत झालेलं नाही. आयपीएलचा अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईत खेळवला जाईल, आणि यंदाच्या हंगामात केवळ ५ डबल हेडर सामने असतील, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या