IPL 2020 ला केंद्र सरकारचा हिरवा कंदील; युएईमध्ये रंगणार हंगाम

505

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) यंदा युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग आयोजित करण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिकृत परवानगी मिळाली आहे. सोमवारी आयपीएलचे चेअरमेन ब्रिजेश पटेल यांनी या आयोजनास केंद्र सरकारने मान्यता दिल्याचे सांगितले. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजित आहे.

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यातच युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्याची परवानगी दिली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा या स्पर्धेचे आयोजन हिंदुस्थान बाहेर करण्यात येत आहे. बीसीसीआयने याबाबतचा निर्णय घेतला आहे. युएईने ही स्पर्धा आपल्या देशात आयोजित करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयला दिला होता. बीसीसीआयला गृह मंत्रालय व परराष्ट्र मंत्रालयाकडून लेखी परवानगी मिळाली आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना पीटीआयशी बोलताना पटेल म्हणाले, ‘होय, आम्हाला लेखी मान्यता परवानगी मिळाली आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या