आयपीएलला केंद्र सरकारचा ‘हिरवा’ कंदील, 10 नोव्हेंबरला रंगणार अंतिम सामना

870

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 सिझनला केंद्र सरकारने हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे यूएईमध्ये स्पर्धा खेळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार असून 10 नोव्हेंबरला अंतिम लढत होणार आहे.53 दिवसांमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे. हिंदुस्थानच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यामध्ये बाधा येऊ नये यासाठी आयपीएल स्पर्धा 26 सप्टेंबरऐवजी एक आठवडे आधी म्हणजेच 19 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.

शनिवार – रविवारी प्रत्येकी दोन लढती होणार
आयपीएलच्या नव्या वेळापत्रकानुसार शनिवार व रविवारी प्रत्येकी दोन सामने आयोजित करण्यात येणार आहेत. 53 दिवसांमध्ये 10 वेळा दुहेरी लढती खेळवण्यात येतील. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल.

तीन ग्राऊंड लढतींसाठी उपलब्ध 
युएईत तीन स्टेडियम्स आहेत. यामध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबुधाबी व शारजाह यांचा समावेश आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी ठेवायची की नाही याचा निर्णय युएईतील सरकार घेईल असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. आयसीसीची ऍकॅडमी खेळाडूंना ट्रेनिंगसाठी उपलब्ध करून दिली जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या