IPL 2020 – टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला गंभीर दुखापत, सरावादरम्यानच सोडले मैदान

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इशांत शर्माला गंभीर दुखापत झाली आहे. सरावाच्या दरम्यान ही दुखापत झाल्याने त्याने मैदान सोडले. त्यामुळे तो आजचा सामनाही खेळू शकणार नाही. तसेच आगामी काही दिवस त्याला आराम करण्याचा सल्ला देण्यात आल्यास तो आयपीएलच्या काही लढतीला किंवा पूर्ण आयपीएललाही मुकण्याच्या शक्यता आहे.

आज दिल्लीचा संघ पंजाब विरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे. या लढतीपूर्वी दिल्लीचा संघ मैदानावर घाम गाळत असून कसून सराव सुरू आहे. सराव सुरू असताना इशांत शर्मा हा गंभीर जखमी झाला आणि सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला. पहिल्या लढतीपूर्वी आघाडीचा गोलंदाज जखमी झाल्याने दिल्लीचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान, ‘क्रीकबझ’ने याबाबत वृत्त दिले असून अद्याप दिल्लीच्या संघाने याबाबत खुलासा केलेला नाही.

आयपीएलमधील रिकॉर्ड
इशांत शर्मा याने आयपीएलमध्ये 89 लढती लेल्या आहेत. यात त्याला 71 विकेट्स घेता आल्या. 2011 ला डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना त्याने कोचीविरुद्ध 12 धावात 5 बळी घेण्याचा विक्रम केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या