IPL 2020 – सहकाऱ्यांना खेळताना पाहून ढसाढसा रडायचा ‘हा’ खेळाडू, द्रविडच्या सल्ल्याने बदललं आयुष्य

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघात खेळला गेला. या लढतीत 7 विकेट्सने बाजी मारत कोलकाताने यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. कोलकातासाठी हा सामना जितका महत्वाचा होता, तितकाच किंबहुना त्याहून जास्त महत्वाचा एका वेगवान गोलांदाजासाठी होता. दोन वर्षांपूर्वी संघात निवड होऊनही मैदानात उतरण्याची संधी न मिळालेला हा खेळाडू पदर्पणाचा सामना खेळत होता. या खेळाडूचे नाव आहे कमलेश नागरकोटी.

कमलेश नागरकोटी याची दोन वर्षांपूर्वी आयपीएलसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघात निवड झाली होती. वेगवान गोलंदाज म्हणून मैदानात उतरण्यापूर्वी त्याला गंभीर दुखापत झाली आणि एकही सामना न खेळता त्याला थेट रुग्णालय गाठावे लागले. येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर जवळपास 19 महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. यादरम्यान आपल्यासोबतच्या खेळाडूंना आयपीएल खेळताना पाहून कमलेशन निराश व्हायचा, ढसाढसा रडायचा. पण टीम इंडियाचा माजी कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविड याने त्याला हिंमत दिली, सल्ला दिला आणि आज हा खेळाडू मैदान गाजवण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे.

IPL 2020 – मयांकने मुरलीचा विक्रम मोडला, संजू सॅमसनने अनोखे ‘शतक’ ठोकले

द्रविडचा सल्ला
कमलेश नागरकोटी याच्यावर राहुल द्रविडच्या देखरेखीखाली उपचार झाले. याबाबत बोलताना एका मुलाखतीत नागरकोटी याने सांगितले की, द्रविडने माझ्यातील विश्वास जागवला. आयपीएलचे एक-दोन सिझन खेळले काय न खेळले काय हे इतके महत्वाचे नाही, तुला टीम इंडियाकडून खेळायचे आहे, असे सांगत मला आत्मविश्वास दिला. आज त्याने आयपीएलमध्ये पदर्पण केले. पहिल्या लढतीत 2 षटकात त्याने 17 धावा दिल्या, मात्र आपल्या वेगाने भल्या-भल्या फलंदाजांना चकित केले.

images-3

कमलेश नागरकोटी हा 20 वर्षीय खेळाडू राजस्थानसाठी ‘लिस्ट ए’चे 9 सामने खेळला आणि यात त्याने 11 बळी घेतले आहेत. 2018 ला न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत नागरकोटी याने 6 लढतीत 9 बळी घेतले होते आणि या बळावर टीम इंडिया चॅम्पियन झाली होती. 150 किमीच्या वेगाने गोलंदाजी करू शकणारा हा गोलंदाज भविष्यात हिंदुस्थानकडून खेळताना दिसल्यास नवल नाही.

Photo – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज

आपली प्रतिक्रिया द्या