IPL 2020 गुणतालिकेतील तळाचे स्थान पंजाबच्या राहुलला नकोय

किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवत आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील दुसरा विजय मिळवला. पण या विजयानंतरही किंग्ज इलेव्हन पंजाबला आयपीएलच्या गुणतालिकेत तळालाच समाधान मानावे लागले आहे. या विजयानंतर कर्णधार लोकेश राहुल म्हणाला, आमचा संघ चांगला आहे. विजयी पंच देण्यात आम्हाला यश मिळाले नाही. त्यामुळे तळाला फेकलो गेला आहे. मात्र हा तळ आम्हाला नकोय.

डिव्हिलीयर्सला खाली पाठवण्याचा निर्णय फसला – विराट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून हार सहन करावी लागली. या लढतीत ए बी डिव्हिलीयर्सला खालच्या क्रमाकांवर पाठवण्याचा निर्णय फसला असल्याची कबुली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने दिली. उजव्या आणि डाव्या हाताने फलंदाजी करणाऱया फलंदाजांना पाठवण्याची योजना आखण्यात आली होती. त्यामुळे ए बी डिव्हिलीयर्सला खाली पाठवण्यात आले, पण हा निर्णय आमच्या कामी आला नाही, असे तो पुढे म्हणाला.

बंगळुरू-पंजाबमधील लढतीतील आकडेवारी
n विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 200 वा सामना खेळला. एका संघासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमावर त्याने मोहोर उमटवली
n युजवेंद्र चहल याने आयपीएलमध्ये 200 बळींचा टप्पा ओलांडला. आयपीएलमध्ये 200 बळी गारद करणारा तो पाचवा हिंदुस्थानी गोलंदाज ठरलाय. याआधी पीयूष चावला (257), अमित मिश्रा (256), रविचंद्रन अश्विन (242) व हरभजन सिंग (235) यांनी ही करामत करून दाखवलीय.

आपली प्रतिक्रिया द्या