IPL 2020 – चक्रवर्तीचा बळींचा ‘पंच’, कोलकाताचा 59 धावांनी विजय

नितीश राणा आणि सुनील नरीनचे अर्धशतक, फिरकीपटू वरून चक्रवर्तीची दमदार कामगिरी या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा 59 धावांनी पराभव केला. कोलकाताने विजयासाठी दिलेले 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची घसरगुंडी उडाली आणि श्रेयस अय्यरच्या संघाला 20 षटकात 9 बाद 139 एवढीच मजल मारता आली.

राणा-नरीनचे अर्धशतक

प्रथम बॅटिंग करताना कोलकाताने 20 षटकात 6 बाद 194 धावा केल्या. नितीश राणाने 53 चेंडूत 81 आणि सुनील नरीनने 32 चेंडूत 64 धावांची खेळी केली.

अय्यरची झुंज

कोलकाताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. अजिंक्य रहाणे शून्य आणि सलग दोन शतक ठोकणारा शिखर धवन 6 धावा काढून बाद झाला.

तिसऱ्या स्थानावर आलेल्या श्रेयस अय्यर याने आधी ऋषभ पंत आणि नंतर इतर फलंदाजांना हाताशी घेऊन सामना भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्लीचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 47 धावा करत एकाकी झुंज दिली.

चक्रवर्तीचा ‘पंच’

दिल्लीचा फिरकीपटू वरून चक्रवर्ती याने आजच्या लढतीत पाच बळी घेतले. त्याने श्रेयस अय्यर, पंत, हेटमायर, स्टोयनिस आणि अक्षर पटेल यांना बाद केले. 4 षटकात 20 धावा आणि 5 बळी अशी त्याची कामगिरी राहिली.

प्ले ऑफकडे वाटचाल

आयपीएल 2020च्या प्ले ऑफ कडे केकेआरची दमदार वाटचाल सुरू आहे. 11 लढतीत 6 विजय मिळवून केकेआरचे 12 गुण झाले असून सध्या चौथ्या स्थानावर विराजमान आहे.

आपली प्रतिक्रिया द्या