IPL 2020 – कार्तिकच्या हाती कमान, रसेल फोडणार गोलंदाजांना घाम; केकेआर तिसऱ्या विजेतेपदासाठी तयार

44470

ganesh-puranik>> गणेश पुराणिक | मुंबई

हिंदुस्थानच्या गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 2012 व 2014 साली आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. तसेच या संघाला 2017 व 2018 सालामध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. शिवाय 2011 व 2016 सालामध्ये चौथे स्थान या संघाने पटकावले. यंदा कोलकाताचे नेतृत्व दिनेश कार्तिकच्या खांद्यावर असून हा संघ तिसऱ्या विजेतेपदावर मोहोर उमटवण्यासाठी जय्यत तयारी करत आहे.

कोलकाताने आयपीएलमध्ये आतापर्यंत 178 लढती खेळल्या आहेत. यात संघाने 92 विजय मिळवला असून 83 लढतीत पराभव स्वीकारला आहे. विजयी लढतीत 2012 आणि 2014 च्या अंतिम लढतीचाही समावेश आहे. तसेच आयपीएल इतिहासात कोलकाताच्या सर्वाधिक 3 लढती टाय झाल्या आहेत.मात्र या तिन्ही लढतीत केकेआरला पराभव स्वीकारावा लागला.

बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश

‘या’ खेळाडूंवर असणार नजर
केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक आणि विस्फोटक आंद्रे रसेल या दोघांवर संघाचा भार असणार आहे. कार्तिकने 182 लढतीत 3,654 धावा चोपल्या आहेत, तर रसेलच्या नावावर 64 लढतीत 186.41 च्या जबरदस्त स्ट्राईकरेटसह 1400 धावांची नोंद आहे. यासह नितेश राणा, शुभमन गिल, सुनील नरीन, इयान मॉर्गन आणि राहुप त्रिपाठी यांच्यावर फलंदाजीची भिस्त असणार आहे. तर गोलंदाजीत 16 लढतीत 17 विकेट्स घेणारा पॅट कमिन्स हा हुकुमाचा एक्का असून लॉकी फर्गुसन, शिवम मावी, कमलेश नागरकोटी यांच्यावर वेगवान गोलंदाजीचा भार असणार आहे. फिरकी गोलंदाजीची कमान 110 लढतीत 122 विकेट्स घेणाऱ्या सुनील नरीनच्या हाती असणार आहे. चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव, प्रवीण तांबे आणि वरूण चक्रवर्ती यांची त्याला साथ लाभणार आहे.

IPL 2020 – सर्वाधिक धावा, विकेट्स ते सर्वाधिक षटकार; 10 प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

कोलकाताचा संघ
दिनेश कार्तिक (कर्णधार), रिंकू सिंह, पी. कृष्णा, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, हॅरी गुरने, संदीप वारियर, नितीश राणा, लॉकी फर्गुसन, शुभमन गिल, कुलदीप यादव, सुनील नरीन, आंद्रे रसेल, सिद्धार्थ लड, इयान मोर्गन, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, एम. सिद्धार्थ, क्रिस ग्रीन, टॉम बेंटन, प्रवीण तांबे आणि निखिल नायक.

IPL 2020 – आरसीबी समोर विजेतेपदाचे ‘विराट’ चॅलेंज, असा आहे बंगळुरूचा संघ

आपली प्रतिक्रिया द्या